नवोदय ऑनलाईन टेस्ट 2
नवोदय ऑनलाईन टेस्ट 2
विषय : भाषा
मराठी माध्यम
उतारा - 3 (2018)
खेड्यातल्या बाजारच्या दिवसाची मजा मुले, स्त्रिया, पुरुष सगळे लुटतात. शेतकऱ्यांना आपला भाजीपाला आणि धान्य आणि आपल्या शेतात पिकवलेल्या सगळ्या वस्तू विकायची ती चांगली जागा असते. सकाळी-सकाळी शेतकरी धान्याची पोतो आणि फळांच्या व भाजीपाल्याच्या टोपल्या यांनी आपल्या बैलगाड्या आणि ट्रॅक्टर भरून टाकतात. बाजारात विकायच्या असलेल्या शेळ्यामेंढ्या, गाई-म्हशी आणि कोंबड्याही बरोबर घेतात. त्यांना बाजारातून वस्तू विकतही घ्यायच्या असतात. त्यांना कपडे आणि मसाले, तसेच कितीतरी घरगुती जिन्नस हवे असतात. त्यांच्या शेताजवळ या गोष्टी सहज उपलब्ध नसतात.
बांगडीविक्रेत्याकडून बायका रंगीत बांगड्या खरेदी करतात. शेकोट्या पेटवल्या जातात. भजी, पुऱ्या आणि भाज्या बनवल्या जातात. समोसे आणि उसाचा रसही फार लोकप्रिय असतो. मुले आपल्या मित्रांसमवेत आनंदाने बागडतात. मुले झोपाळ्यावर आणि मेरी-गो-राऊंड मध्ये बसतात. प्रत्येकाला बाजारचा दिवस प्रिय असतो.
1. शेतकरी आपला भाजीपाला आणि धान्य बाजारात कसे घेऊन जातात ?
(A) त्यांच्या ट्रकमधून आणि मोटारगाड्यांतून
(B) त्यांच्या बैलगाड्यांतून आणि ट्रॅक्टरमधून
(C) स्वतःच्या डोक्यावरून नेतात
(D) मदतनीसांकडून आणि मित्रांकडून.
2. शेतकरी अजून काय बाजारला घेऊन जातात ?
(A) त्यांची गुरे व कोंबड्या
(B) फर्निचर
(C) कपडे
(D) खेळणी.
3. 'पोती' या अर्थाचा पुढीलपैकी कोणता शब्द आहे?
(A) पेट्या
(B) पिशव्या
(C) डबे
(D) पॅकेट.
4 मुले बाजारात काय करतात ?
(A) भाजीपाला व धान्य विकतात.
(B) कोंबड्या आणि शेळ्या खरेदी करतात.
(C) मित्रांबरोबर बागडतात.
(D) भजी आणि समोसे विकतात.
5. खेड्यातला बाजारचा दिवस शेतकऱ्यांसाठी का चांगला असतो ?
(A) शेतकऱ्यांना बाजारात आपले मित्र भेटतात.
(B) शेतकऱ्यांनी पिकवलेला माल विकण्याचे ते चांगले ठिकाण असते.
(C) शेतकरी बाजारात खूप मजा करतात.
(D) शेतकऱ्यांना बसायची व समोसे खायची संधी मिळते.
👉
Comments
Post a Comment
Thank you for you answers...